मनोरंजनाची मेजवानी व मैत्रीची पर्वणी असा हा 'वर्धमान सांस्कृतिक मंच.
छत्रपती संभाजी नगर परिसरातील आर्थिक क्षेत्रातील नावाजलेली संस्था, केवळ आर्थिक विश्वात न रमता सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात देखील आपले नाव गाजवणारी संस्था, आपल्या शिस्तबध्द, कार्यकुशल आणि कार्यतत्पर कर्मचारी वर्गाच्या मदतीने अनेक स्तरावर यशस्वी वाटचाल करणारी एक स्वयंभू संस्था. या यशावर भाळून जावे असे कर्तृत्व, यशाचे गमक जाणून घ्यावे अशी उत्कंठा निर्माण करणारी "वर्धमान" ही संस्था. कोट्यावधीच्या कौतुकाची थाप आणि तितक्याच गरजवंतांचा आर्शिवाद मिळवत समाधानी वृत्तीने अनेक शिखर काबीज करीत निघालेली ही संस्था अनेकांच्या गळ्यातील ताईत ठरत आहे.
डॉ. शांतीलाल सिंगी या ध्येयवेड्या अध्यक्षांच्या पाठीशी आहेत त्यांचे हितचिंतक मित्र, संस्थेचे सदस्य व कर्मसिध्द कर्मचारी.वर्धमान पतसंस्थेची यशस्वी वाटचाल चालू असतानाच सभासद, मित्रमंडळी, हितचिंतक यांच्या गाठी-भेटी होत असताना असे लक्षात आले की, मुंबई, पुणे येथे अनेक दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल नेहमीच असते.
मराठवाड्याची आर्थिक राजधानी असलेल्या आपल्या छत्रपती संभाजी नगर शहरात मात्र अगदीच कमी प्रमाणात मराठी नाटके, हास्य कवि संम्मेलन, गायन, वादन, गझल, शास्त्रीय संगीत व इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाची भूक भागवण्यासाठी, दर्जेदार कार्यक्रमाचा आपणा सर्वांना कुटुंबासोबत आस्वाद घेण्यासाठी, धावपळीच्या व अत्यंत धकाधकीच्या तसेच इलेक्टॉनिक्स मिडियाच्या कोलाहलातून निवांतपणे तीन तास मनोरंजनाचे मिळावेत व आपल्या मित्रांसोबत सुसंवाद घडावा या हेतूने २०१२ मध्ये 'वर्धमान सांस्कृतिक मंच' ची मुहर्तमेढ रोवली गेली.
'वर्धमान सांस्कृतिक मंच' हा समाजातील विविध क्षेत्रातील रसिक मंडळी एकत्र येवून स्थापन झालेला मंच आहे. त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन अतिशय चोखंदळपणे, उत्साहपूर्ण वातावरणात व नाविन्यपूर्ण पणे होत असते. 'मनोरंजनाची मेजवानी व मैत्रीची पर्वणी' असा हा 'वर्धमान सांस्कृतिक मंच.
छत्रपती संभाजी नगर व परिसरातील रसिक सभासदांसाठी उत्कृष्ट व दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे, नवीन कलाकारांसाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्या कला गुणांना प्रोत्साहन देणे !
छत्रपती संभाजी नगर शहर व परिसरातील १०००० अधिक सभासद बनवणे.नाटक, नृत्य, संगीत व इतर मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त कार्यक्रमाचे आयोजन करणे. शहरातील सांस्कृतिक कला, वारसा समृद्ध करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे. तसेच स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय स्तरावरील कलाकरांत समावेश करण्यास प्रयत्न करणे.